Pune Municipal Corporation : बायोमॅट्रीक हजेरीला महापालिका कर्मचाऱ्यांचा ठेंगा

महापालिकेतील ७ हजार ९८२ कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक नोंदणी पूर्ण झाली आहे. पण या प्रणालीवर हजेरी लावणाऱ्यांचे प्रमाण हे ५० टक्केपेक्षा कमी आहे.
Pune Municipal Corporation biometric punching

Pune Municipal Corporation biometric punching

sakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रीक प्रणालीवर हजेरी लावणे आवश्‍यक आहे. पण फक्त तीन हजार ते साडेतीन हजार कर्मचारीच रोज बायोमॅट्रीक हजेरी लावत आहेत. त्यामुळे एकीकडे ऑनलाइन सेवेत सर्वोत्तम अशी कौतुकाची थाप घ्यायची आणि दुसरीकडे ऑनलाइन हजेरीबाबत उदासीनता दाखवायची असे दुटप्पी धोरण दिसून येत आहे. त्यामुळे १ मार्चपासून बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com