

pune municipal election
esakal
पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी शहरात इच्छुकांचे पेव फुटले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. ९६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेत तलवारी म्यान केल्या आहेत. निवडणुकीचे रण तापले असून, आता प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार अशा १६५ जागांवर एकूण १ हजार १६५ उमेदवारांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे.