esakal | निवडणुकीत ७०० केंद्रांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

निवडणुकीत ७०० केंद्रांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जनगणना आणि मतदार संख्येतील (voter count) तफावतीमुळे आगामी महापालिका (Municipal) निवडणुकीत (Election) मतदार केंद्रांच्या संख्येत जवळपास ७०० केंद्रांची नव्याने भर पडणार आहे. एका केंद्रासाठी (Center) किमान पाच कर्मचारी वर्ग धरला, तर किमान ३५०० जण निवडणुकीसाठी (Election) लागणार आहे. त्यामुळे हे मनुष्यबळ कसे उभे करायचे, असा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा राहणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे या निवडणूकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरणार आहे तर मतदारसंख्या ही २०२१ मधील ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी आणि मतदारसंख्या जास्त असे चित्र निर्माण होणार आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे त्याचा परिणाम मतदान केंद्रांवरही होणार आहे.

हेही वाचा: विधान परिषद निवडणूकीसाठी कॉंग्रेसमध्ये २५० वर इच्छुक, नेते दाखवताहेत श्रेष्ठींकडे बोट !

महापालिका निवडणूकीसाठी ८०० ते १००० मतदारांसाठी मतदान केंद्र ग्राह्य धरले जाते. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत साधारणपणे साडेतीन हजार मतदान केंद्र होते. गेल्या १० वर्षांत वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वसाधारणपणे मतदान केंद्रांची संख्या सुमारे सातशेने वाढण्याची शक्यता आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एका केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिळून किमान पाच जणांची नेमणूक करावी लागते.

याशिवाय, निवडणुकीसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या संख्येच्या ३० टक्के संख्या ही राखीव म्हणून ठेवावी लागते, असा नियम आहे. हा विचार केला, तर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासाठी प्रशासनाला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. मात्र, त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली होताना दिसत नसल्याचे समोर आले आहे.

loading image
go to top