

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर मतदान होत असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता आहेच, पण त्यासोबत उमेदवारांमध्येही धाकधूक आहे. पुण्यात १ हजार १५३ उमेदवारांचे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६९१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.