

pune municipal election
esakal
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज ४१ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री साडेबारापर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी प्राप्त होऊ शकली नाही. मात्र, शहरात सुमारे ५३ टक्के इतके मतदान झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत २०२६ मध्ये सुमारे पावणेचार लाख मतदारांची नव्याने भर पडल्याने त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, याची स्पष्टता उद्या येणार आहे.