‘असुरक्षित’ इच्छुक

सलील उरुणकर - @salilurunkar
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

निवडणुका जवळ येत आहेत तसा प्रचाराचा वेगही वाढणार आहे. प्रभागामध्ये झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची चांगलीच गोची झाली आहे. नव्याने जोडलेल्या भागातील मतदार ओळखत नाहीत आणि ज्या भागात काम करणे अपेक्षित होते तिथे मतदारांनी चांगलेच ‘ओळखून’ घेतले आहे.

त्यामुळे आता पुन्हा मते मागण्यासाठी सोसायट्यांमध्ये फिरून ‘प्रभाग रचनेत माझ्यावर अन्याय झाला आहे’, असे भावनिक आवाहन करण्यापलीकडे फारसा पर्याय राहिलेला नाही. अशाच एका इच्छुकाने काही सोसायट्यांमध्ये दौरा केला आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यास सुरवात केली. 

पण प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवारानेही त्याच सोसायट्यांमधील मतदारांना विविध ऑफर देऊन ‘जवळ’ केले. त्यामुळे असुरक्षित झालेल्या इच्छुकाने पुन्हा सोशल मीडियावरच आगपाखड करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर पूर्ण माहितीच टाकणार नाही अशी विचित्र भूमिका या इच्छुकाने घेतली आहे. माहिती टाका किंवा नका टाकू, ऑफर द्या नाहीतर बैठका घ्या.. मतदारांनी त्यांचा विचार पक्का केला आहेच.. त्यामुळे मतदार कोणाची ऑफर स्वीकारणार आणि कोणाला कायमचे असुरक्षित करणार हे येत्या काही दिवसांत कळेलच.

Web Title: municipal election unsecure candidate