Flex in Balewadi
sakal
बालेवाडी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर-बालेवाडी परिसरातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांकडून सोसायट्यांमध्ये भेटीगाठी व प्रचारदौरा सुरू आहेत.
अशावेळी बालेवाडी येथील ‘साई सिलिकॉन व्हॅली’ सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’ असा फलक लावून रहिवाशांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. या फलकामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून तो येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.