पुणे - पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरु केले आहे. राजकीय पक्षांचीही आपल्या हक्काचा मतदार विभागला जाऊ नये, एकगठ्ठा मतदान मिळून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी खलबते सुरु झाली आहे..शहरातील वजनदार नेते त्यांचा त्यांचा प्रभाव वापरून स्वतःचा प्रभाग ‘सेफ’ करून घेतीलच. पण चार सदस्यांचा प्रभाग असल्याने यात कोणता पक्ष मुसंडी मारणार याची उत्सूकता आहेच. २०१७ ला चारचा प्रभाग असताना भाजपचे मुसंडी मारून सत्ता मिळवली होती.पण हा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांच्यासाठी ही प्रभाग रचना डोकेदुखी ठरली आहे. भाजप यावेळीही चारच्या प्रभाग रचनेचा फायदा उठवेलच पण अन्य पक्षांनाही भाजपला रोखून धरण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे..२००२ ते २०१७ या कालावधीत चार महापालिका निवडणुकांमध्ये एक वेळ तीनचा प्रभाग, दोन वेळा दोन सदस्यांचा प्रभाग तर एक वेळ चार सदस्यांचा प्रभाग होता. जेवढे प्रभाग छोटे तेवढी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जिंकण्याची शक्यता वाढते. पण जास्त सदस्यांचा प्रभाग हा भाजपच्या फायद्याचा ठरतो.२००२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती, पण त्यानंतर २००७, २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत आघाडी झालेली नाही. तर २००२, २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती. भाजपची ताकद वाढल्याने २०१७ मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत युती केली नव्हती..२०२५ च्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडी स्वबवळाची भाषा आहे. पण राज्यात महायुती असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय निवडणूक लढण्याचा निर्णय इतक्यात घेतला जाणार नाही.त्याच प्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तीन पक्षांची स्थिती नाजूक असली तरी त्यांनीही आघाडीचा निर्णय अजून घेतला नाही. अशा स्थिती ही चारची प्रभाग रचना पुन्हा भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे..प्रभाग रचना आणि त्याचे परिणाम२००२ ला तीन सदस्यीय प्रभाग रचना होतीप्रभागांची संख्या - ४२एकूण सदस्य - १२६भाजपला - ३५शिवसेना - २१काँग्रेस - ४२राष्ट्रवादी काँग्रेस - २८.२००७ ला दोन सदस्यीय प्रभाग रचना होतीप्रभागांची संख्या - ७२एकूण संख्या - १४४राष्ट्रवादी काँग्रेस - ४८काँग्रेसचे - ३८भाजप - २५शिवसेना - २०मनसे -८अन्य - ५.२०१२ ला दोन सदस्यीय प्रभाग रचनाप्रभागांची संख्या - ७६एकूण संख्या - १५२राष्ट्रवादी काँग्रेस - ५३मनसे - २८काँग्रेस - २७भाजप - २६शिवसेना - १५इतर - ३.२०१७ ला चार सदस्यीय प्रभाग रचनाप्रभाग - ४१एकूण संख्या - १६२भाजप - ९७राष्ट्रवादी काँग्रेस - ४२शिवसेना - १०काँग्रेस - ९मनसे - २एमआयएम - १अपक्ष - ४.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.