पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी आज (ता. २०) जाहीर झाली असून, एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार मतदान करू शकणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ९ सूस-बाणेर-पाषाण हा सर्वाधिक १ लाख ६० हजार २४२ मतदारांचा आहे..तर सर्वात कमी ६२ हजार २०५ मतदार हे प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर येथे आहेत. एकूण ४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमधील मतदारांची संख्या ही एक लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असून, त्यातील आरक्षित प्रभागही निश्चित झालेली आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. प्रारूप मतदार यादी करताना अनेकदा एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जातात. त्यावरून मोठा गोंधळ होतो..मतदारांची विभागणी झाल्याने उमेदवारांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागते. त्यामुळे प्रारूप मतदार यादी करताना महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवून असतात. तर प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदार यादीतील नावे तपासली जातात. चुकीची नावे घुसली असतील तर हरकत घेता येते.निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी आज ही प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी पात्र असणार आहे..यानुसार ४१ प्रभागांमध्ये ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा असला तरी या ठिकाणची मतदार संख्या ही १ लाख ४८ हजार इतकी आहे. पण यापेक्षा जास्त मतदारसंख्या ही प्रभाग क्रमांक ९ सूस-बाणेर-पाषाण या प्रभागाची आहे. येथील मतदारसंख्या तब्बल १ लाख ६० हजार इतकी आहे..एकत्रित हरकतीवर हरकतप्रारूप मतदार यादीतील मतदारांवर हरकत असेल तर नागरिकांना वैयक्तीक तक्रार करता येतील किंवा दोन सोसायट्यांमध्ये विभागणी झाली असेल तर सोसायटीचे अध्यक्ष, सचिव हे त्यांची लेख हरकत नोंदवू शकतील.राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रितपणे हरकत नोंदविता येणार नाही. त्यामुळे प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले असतील तर संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांना हरकत नोंदविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रयत्न करावे लागणार आहेत..३ लाख दुबार मतदारशहरात ३५ लाख ५१ हजार मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख ४६८ दुबार मतदार आहेत. हे मतदार शोधण्यात आले आहेत. त्यांच्या नावा पुढे दोन स्टार करण्यात आलेले आहे. या मतदारांना महापालिकेचे कर्मचारी भेटून त्यांना कोणत्या तरी एका ठिकाणी मतदार करायला सांगतील. त्यासाठी त्यांच्याकडून तसा अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे एक मतदार दोन ठिकाणी मतदार करू शकणार नाही, असे नवल किशोर राम यांनी सांगितले..- प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०२५- हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : ५ डिसेंबर २०२५- मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान यादी जाहीर करणे : ८ डिसेंबर २०२५- मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५.प्रभाग आणि मतदार संख्याप्रभाग क्रमांक १ कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित - १०५७१३प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपूरचाळ - ७८६२६प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगाव - १०७०२८प्रभाग क्रमांक ४ खराडी-वाघोली - १२४६६७प्रभाग क्रमांक ५ कल्याणी नगर-वडगाव शेरी - ८२१३२प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगर - ७२५०७प्रभाग क्रमांक ७ गोखले नगर-वाकडेवाडी - ८०४५१प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी - ९०७९९प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण - १६०२४२प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी - ७९२७८.प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर - ७०६०५प्रभाग क्रमांक १२ शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी - ७२४८०प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन-जयजवान नगर - ७६१३६प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी मुंढवा - ७१८१९प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी - १११७३५प्रभाग क्रमांक १६ हडपसर-सातववाडी - ९१४२२प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी-माळवाडी वैदुवाडी - ८२०४४प्रभाग क्रमांक १८ वानवडी-साळुंखे विहार - ७११३८प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द-कौसरबाग - १०२५५३प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ-बिबवेवाडी - ६५०६१.प्रभाग क्रमांक २१ मुकुंद नगर-सॅलिसबरी पार्क - ६९१२२प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी-डायस प्लाॅट - ७३००२प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ - ७९७२६प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय-केएमइ रुग्णालय - ७०७०७प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई - ७१७६५प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ-गुरूवार पेठ-समताभूमी - ६७००८प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वती - ७०८३८प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत-हिंगणे खुर्द - ७३१०४प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना-हॅपी काॅलनी - ६८६६८प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी - ६९२११.प्रभाग क्रमांक ३१ मयूर काॅलनी-कोथरूड - ८१४४९प्रभाग क्रमांक ३२ वारजे-पाॅप्युलर नगर - ८७४३८प्रभाग क्रमांक ३३ शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट - ११४८८२प्रभाग क्रमांक ३४ नर्हे वडगाव-बुद्रूक धायरी - १०४७९८प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी-माणिकबाग - ६९८०२प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावती - ७९९२५प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी-कात्रज डेअरी - ७४५१९प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव कात्रज - १४८७६९प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर-इंदिरानगर - ६२२०५प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी - ९८९१३प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी-उंड्री - ११९१६७एकूण मतदार - ३५५१४६९.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.