Pune : लोहगावमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोहगावमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

लोहगावमधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

लोहगाव : येथील सर्व्हे क्रमांक ३०२ मधील मोझेनगरमध्ये पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे दहा हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

पुणे महापालिकेने या बांधकामाला सुमारे दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. मात्र तरीही हे अनधिकृत बांधकाम जागेवर कायम असल्याने आज ही कारवाई करण्यात आली. प्रभारी कार्यकारी अभियंता अजित सुर्वे, उपअभियंता हनुमान खलाटे, इमारत निरीक्षक निखिल गुलेछा, प्रतीक पाथरकर, प्रकाश कुंभार यांनी एक 'जॉ कटर', दोन ब्रेकर, दोन जेसीबी मशीन, एक 'गॅस कटर', दहा बिगारी कामगारांच्या मदतीने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडली.

loading image
go to top