पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

महापालिकेच्या वाय सी एम रुग्णालयात दहा आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात ४० बेडचे कोरोना विलगिकरण कक्ष तयार ठेवला आहे. तसेच सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलेशन बेडसह सात व्हेंटिलेटर तयार ठेवले आहेत.

वाय सी एम व भोसरी रुग्णालयात विलागिकरण कक्ष
पिंपरी - महापालिकेच्या वाय सी एम रुग्णालयात दहा आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात ४० बेडचे कोरोना विलगिकरण कक्ष तयार ठेवला आहे. तसेच सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलेशन बेडसह सात व्हेंटिलेटर तयार ठेवले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या १५ दिवसात विदेशातून आलेल्या ३१ प्रवाशांचा शोध घेतला आहे. त्यापैकी २० प्रवाशांची १४ दिवस तपासणी केली आहे. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आलेले नाहीत. पाच संशयितांना वाय सी एम मधील कोरोना आयसोलेशन वॉर्डांत दाखल केले आहेत. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एन आय व्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी यांची कोरोना विषयी माहिती देण्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, फक्त काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

तसेच, जनजागृती साठी १६४ ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. १५ लाख हस्त पत्रिका नागरिकांपर्यंत पोहचविले आहेत. पाच हजार स्टिकर्स व पाच हजार पोस्टर्स विविध ठिकाणी चीकटविले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, पी डी डी ए अशा वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांची कार्यशाळा घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal medical department ready for Corona background