‘सारथी’च्या पुनरुज्जीवनाची गरज

Sarathi-Helpline
Sarathi-Helpline
Updated on: 

पिंपरी - महापालिकेच्या सारथी या हेल्पलाइन उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. मात्र, सारथीवर दाखल होणाऱ्या सुमारे ५६ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तक्रारी विलंबाने, तर अनेक तक्रारींवर कार्यवाही न होताच निकाली काढल्या जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘सारथी’ला पुनरुज्जीवनाची गरज आहे. 

सरकारी कामकाज, विभागाची माहिती आणि नागरिकांच्या तक्रारी नियोजनबद्धपणे सोडविण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी १५ ऑगस्ट २०१३ ला सारथी (८८८८००६६६६) हेल्पलाइन सुरू केली. त्यावर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या समस्या, तक्रारी कालावधीत सोडविण्याची सक्ती केली होती. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर करवाई होत असल्याने पालिकेचे सर्व विभाग प्रत्येक तक्रारीची दखल घेत होते. मात्र, परदेशी यांची बदली झाल्यानंतर यंत्रणा कोलमडली असून अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

तक्रारदाराला सूचना 
सारथीवर तक्रार केल्यास संबंधित अधिकारी तक्रारदाराची माहिती नगरसेवकांना पुरवतात. नगरसेवक संबंधित तक्रारदाराला सारथीवर तक्रार न देण्याची धमकी वजा सूचना देत ‘काही तक्रार असल्यास मला सांगा’ असे सांगत असल्याचे प्रकार घडत आहेत. भटक्‍या डुकरांची तक्रार दिल्यास तक्रारदाराला थेट डुकरांच्या मालकाचीच धमकी येते, असे नागरिक सांगताहेत. तक्रारीवर नजर ठेवण्यासाठी काही नगरसेवकांचे हस्तकच सारथीमध्ये काम असल्याचे त्यांना सांगितले.

बंद केलेल्या तक्रारी पुन्हा पाहण्याची सुविधा आहे. काही तक्रारी महापालिका अधिपत्याखालील नसतात, अनेक तक्रारी सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नसते, काही न्यायालयाच्या संबंधित असल्यास त्यावर कार्यवाही होत नाही.
- नीलकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका

१५ ऑगस्ट २०१३ ते ७ फेब्रुवारी २०१९ (फोन व मोबाईल ॲप)
१,०७,५५६ एकूण तक्रारी
४५,१२५ मुदतीत निकाली
६१,१६० विलंबाने निकाली
१,०६,३१५ एकूण निकाली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Aspirants Continue Their Protest in Pune While Demanding an Inquiry Into the Commission Chairman
Patient Reportedly Falls from Moving Ambulance at YCM Hospital
MPSC Student Agitation
A lump of ice weighing over 15 kg fell from the sky into a farm.
Marathi News Esakal
www.esakal.com