

महापालिका शाळांचे ‘अ, ब, क, ड’ श्रेणीत वर्गीकरण
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश; सुविधांच्या आधारे शाळांचा दर्जा उंचावणार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : महापालिकेच्या शाळांमधील मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन त्यांचे ‘अ, ब, क, ड’ श्रेणीत वर्गीकरण करावे. त्यानुसार त्रुटी दूर करून शैक्षणिक वातावरण व सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
सोलापूर शहरात महापालिकेच्या ५८ शाळा असून, त्यात २२६ शिक्षक आणि ४ हजार ९३५ विद्यार्थी आहेत. प्रत्येक शाळेची स्वतंत्र पाहणी करून उपलब्ध सुविधा, आवश्यक दुरुस्ती आणि उणिवांची नोंद करावी, अशा सूचना गोरे यांनी दिल्या.
वर्गखोल्या व इमारतीची स्थिती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि अन्य मूलभूत सुविधांच्या आधारे श्रेणी निश्चित करावी. प्रत्येक श्रेणीतील शाळांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळेल, यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
----------------------
चौकट :
कोणत्या सुविधांची तपासणी?
वर्गखोल्या व इमारतीची स्थिती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, शैक्षणिक साधने, सुरक्षिततेच्या उपाययोजना, दुरुस्ती आणि अन्य मूलभूत सुविधांची गरज तपासली जाणार.
----------------------
आकडे बोलतात
एकूण शाळा : ५८
कार्यरत शिक्षक : २२६
विद्यार्थी : ४ हजार ९३५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.