बांधकामातील कचरा, राडारोडा टाकण्यासाठी महापालिकेने या जागा केल्या निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment

बांधकामातील कचरा, राडारोडा टाकण्यासाठी महापालिकेने या जागा केल्या निश्चित

पुणे - घराचे नूतनीकरण करताना तयार झालेला कचरा, (Garbage) बांधकामातील कचरा टाकायचा कुठे?, असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. त्यासाठी महापालिकेने (Municipal) क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जागा (Place) निश्‍चीत केल्या आहेत. पण, त्याची माहिती नसल्याने हा राडारोडा थेट नदीपात्रात किंवा ओढे-नाल्यांमध्ये अनेकजण टाकतात आहे. त्यासाठी १५ पैकी १० क्षेत्रीय कार्यालयात जागा उपलब्ध झालेल्या आहेत. (Municipal Sure these Places Used for Dumping Construction Waste Scrap)

शहरात नवीन बांधकामे व जुन्या इमारतींचे नूतनीकरण किंवा त्या पूर्णपणे पाडणे यातून मोठ्या प्रमाणात वीटा, माती, सिमेंट काँक्रिट, खडी असा पुन्हा वापर करता येणार कचरा तयार होतो. हा कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने ठेकेदारास पैसे देऊन ‘कशी विल्हेवाट लावायची ते तुझ तूच बघ, असे सांगितले जाते. काही जण लपून नदी, नाले, मोकळ्या जागेत हा कचरा टाकतात. त्यामुळे विद्रूपीकरण होत आहे.

महापालिकेने वाघोली येथे मार्च २०२० मध्ये ‘कन्स्ट्रक्शन वेस्ट’ प्रकल्प सुरू केला आहे. त्यामध्ये फक्त सिमेंट काँक्रिट आणि खडी यावरच प्रक्रिया केली जाते. इतर मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया न करता हा कचरा वाघोली येथील खाणीत टाकला जातो. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने नदीत राडारोडा टाकल्याने मेट्रो आणि महापालिकेला फटकारले होते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणचा राडारोडा वाघोली येथे नेऊन टाकण्यात आला.

हेही वाचा: परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बांधकामातून तयार होणारा कचरा टाकण्यासाठी जागा शोधण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत १५ पैकी १० ठिकाणी जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी बांधकामाचा कचरा टाकल्यास, त्याची महापालिकेतर्फे मोफत विल्हेवाट लावली जाते.

या आहेत जागा

क्षेत्रीय कार्यालय निश्‍चीत केलेली जागा

नगर रस्ता- वडगाव शेरी खराडी

शिवाजीनगर-घोले रस्ता वडारवाडी, गोंधळेकर चौक, पाटील इस्टेट, जनवाडी

कोथरूड- बावधन सुतारदरा

धनकवडी-सहकारनगर सर्वे क्रमांक ८, आंबेगाव

सिंहगड रस्ता महादेवनगर, कालव्यालगत (प्रभाग ३४), फरशी पूल, दत्तवाडी, जनता वसाहत, अलका चौक

वारजे-कर्वेनगर सर्वे क्रमांक ८६, बीएसयूपी इमारतीजवळ

हडपसर सर्वे क्रमांक ४९ व ५१, काळेपडळ ॲमिनीटी स्पेस

वानवडी-रामटेकडी एचएम रॉयल पार्किंगजवळ, ॲमिनीटी स्पेस, कोंढवा

कोंढवा-येवलेवाडी एचएम रॉयल पार्किंगजवळ, ॲमिनीटी स्पेस, कोंढवा

कसबा-विश्रामबाग डांबर कोठी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ

खालील क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही

येरवडा-कळस, ढोले पाटील रस्ता, औंध-बाणेर, भवानी पेठ व बिबवेवाडी.

दोन टनापर्यंत कचरा स्वीकारला जातो

महापालिकेने निश्‍चीत केलेल्या जागेवर दोन टनापर्यंत बांधकामातून निर्माण झालेला कचरा टाकता येतो. त्यासाठी कोणतेही शुल्क महापालिका घेत नाही. पण, त्यापेक्षा जास्त कचरा असेल तर थेट वाघोली येथील प्रकल्पात नेऊन टाकण्यास सांगितला जातो. घरगुती काम करताना निर्माण झालेला कचरा टाकण्यासाठी या जागा सोईच्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नदीपात्र, ओढे-नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: Municipal Sure These Places Used For Dumping Construction Waste Scrap

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DumpingScrap
go to top