esakal | आंबेगावात अनधिकृत बांधकामे उद्धवस्त; महिनाभर होणार महापालिकेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal take action against Unauthorized construction will be demolished in Ambegaon for a month

अनधिकृत कोणतीही बांधकाम करू नयेत तसेच निवासी भागातही पुणे मनपाची परवानगी घेऊनच बांधकामे करावूत असे आवाहन पुणे मनपा प्रशसना मार्फत करण्यात आले आहे .

आंबेगावात अनधिकृत बांधकामे उद्धवस्त; महिनाभर होणार महापालिकेची कारवाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धायरी (पुणे) : सिंहगड रस्त्यावरील आंबेगाव बुद्रुक येथील, सिंहगड कॉलेज कॅम्पस शेजारील सर्वे क्रमांक ९ वरील पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक दोन यांनी जॉ कटर व दोन जेसीबीच्याच्या सहाय्याने साडेसात हजार स्क्वेर फूटचे तीन मजली बांधकाम जमीन उध्वस्त करण्यात आले.

यावेळी अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्येकरी अभियंता नामदेव गंभीरे, उपअभियंता राहुल साळुंके, कैलास कराळे, कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर, संदेश पाटील ,प्रताप धायगुडे तसेच भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगनाथ कळसकर यांनी या कारवाई साठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. यावेळी मनपा अतिक्रमण विभागाचा वीस पोलिसांसह मनपा तेरा अधिकऱ्यानी ही कारवाई केली .

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

अनधिकृत कोणतीही बांधकाम करू नयेत तसेच निवासी भागातही पुणे मनपाची परवानगी घेऊनच बांधकामे करावूत असे आवाहन पुणे मनपा प्रशसना मार्फत करण्यात आले आहे .

एका इमारतींवर कारवाई.. .इतरांचे काय....
सिंहगड रस्ता परिसरात पुणे महानगरपालिका हद्दीत वडगाव धबाडी ,धायरी, आंबेगाव आत नऱ्हे परिसरात तसेच इतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आज दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली मात्र इतर अनधिकृत इमारतींचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे