पुणे - आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता मिळकतकर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. यासाठी महिलांची १२ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यात ६० महिलांचा समावेश आहे.
पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २७२७ कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण या वर्षात हे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले असून, आत्तापर्यंत २१५० कोटी रुपयेच वसुल झाले आहेत.
त्यामुळे उर्वरित १५ दिवसात सुमारे ६५० कोटी रुपये कर वसुली करणे प्रशासनाला अशक्य आहे. पण या शेवटच्या १५ दिवसात जास्तीत जास्त कर वसुली करून ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरु आहेत.
त्यासाठी महापालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणे, थकबाकीदाराच्या मिळकतीपुढे बॅंड वाजविणे, इमारती जप्त करणे, टाळे ढोकणे अशी कारवाई केली जात आहे. ही कारवाई आणखी प्रभावी करण्यासाठी खास महिला कर्मचाऱ्यांचे थकबाकी वसुलीचे १४ पथक तयार केले आहेत. त्यात ६० महिलांचा समावेश आहेत.
मिळकतकर विभागाचे उपयुक्त माधव जगताप म्हणाले, महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीच्या वसूलीसाठी आता कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचीही नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी ६० महिला कर्मचाऱ्यांची १२ पथके वसूलीसाठी नेमण्यात आली आहेत.
महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांवर ही वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा प्रयोग पहिलेंदाच करण्यात आला असून, पहिल्या दिवशी या पथकाने तीन मिळकती जप्त केल्या आहेत. तर १० लाख रुपयांची वसुली केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.