पुणे - शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव झाला आहे, पण या नसबंदी करून कुत्र्यांना सोडून देण्याशिवाय महापालिका काहीच करू शकत नाही. भटके कुत्रे नागरिकांवर हल्ले करत आहेत, त्यात अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. यातील अनेकांची स्थिती हलाखीची असते..अशा नागरिकांना मदत म्हणून महापालिका त्यांच्या उपचाराचा खर्च करणार आहे. तसेच इतर नैसर्गिक दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी महापालिका मदत करणार आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीपुढे सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे, गेल्या काही वर्षापासून महापालिका कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदीची शस्त्रक्रिया करत असली तरीही कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या ११ महिन्यात २३ हजार ३७४ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे..शहरातील प्रत्येक रस्ता, चौकात कुत्र्यांची झुंडी फिरत असतात. रात्रीच्या वेळी तर दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागून अपघात होतात, त्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना वारंवार होतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत असतात.कात्रज, येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला, चेहऱ्यावर खोलवर जखम झाली असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन या मुलाची भेट घेतली, तसेच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी रोज त्याच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत..प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शुक्रवारी (ता. २०) स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा केली. महापालिका भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी शस्त्रक्रिया एवढीच कारवाई करू शकते. नागरिकांच्या तक्रारी असल्या तरी कुत्र्यांना तेथून हुसकावून लावू शकत नाही. जर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यास नागरिकांच्या उपचाराचा खर्च महापालिका करेल..तसेच शहरात झाड पडून किंवा अन्य नैसर्गिक घटनेत नागरिक जखमी होतात. अशा नागरिकांनाही मदत करण्याबाबत धोरण तयार करावे आणि त्याची स्थायी समितीची मान्यता घ्यावी असे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले आहेत. त्यानुसार आता आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव तयार करून स्थायीच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.आरोग्य प्रमुख डॉ. रीना बोराडे म्हणाल्या, ‘‘कात्रज येथे भटक्या कुत्र्याने चावलेल्या मुलाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांना महापालिका मदत करणार आहेत. तसेच भविष्यात अशा घटना घडल्यास जखमींवर उपचार करण्यासाठी महापालिका मदत करणार आहे. आयुक्तांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे..अर्थसंकल्पात तरतूदमहापालिकेच्या अंदाजपत्रकात दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी स्वतंत्र तरतूद नाही. पण त्यासंदर्भातील धोरण तयार केल्यानंतर ही मदत करता येणे शक्य आहे. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात अशा घटनांमध्ये मदत करण्यासाठी तरतूद केली जाणार आहे.कुत्र्याने चावा घेतलेल्या घटना२०२४ नोव्हेंबरपर्यंत - २३,३७४२०२३ - २२,४९५२०२२ - १६०७७२०२१ - १५९७२२०२० - १२७३४२०१९ - १२२५२.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.