esakal | अवघ्या 3 हजार रुपयांवरुन झालेल्या मारहाणीच्या रागात मित्राचा खून; औंध येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of boy out of anger over a beating for three thousand rupees for mobile

 

  • मोबाईल खरेदीच्या तीन हजार रूपयांवरुन झालेल्या मारहाणीच्या रागातुन तरुणाचा खून
  • औंध येथे सोमवारी रात्री आठ वाजता घडली घटना, चतु:शृंगी पोलिसांनी एकास घेतले ताब्या

 

अवघ्या 3 हजार रुपयांवरुन झालेल्या मारहाणीच्या रागात मित्राचा खून; औंध येथील घटना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : मोबाईलच्या अवघ्या तीन हजार रूपयांच्या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता औंध येथे घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

क्षितीज वैरागर (वय 22, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनिकेत दीक्षित असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितीज व अनिकेत हे एकमेकांच्या ओळखीचे होते. काही महिन्यापूर्वी मोबाईल खरेदीच्या तीन हजार रूपयांवरुन दोघामध्ये भांडणे झाली होती. त्यावेळी क्षितीजने अनिकेतला जबर मारहाण केली होती. तेव्हा अनिकेतने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात क्षितीज विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अनिकेतने त्या भांडणाचा राग मनात ठेवला होता. सोमवारी रात्री आठ वाजता क्षितीज हा तो राहात असलेल्या वस्तीत थांबाला होता. त्यावेळी अनिकेत हा तेथे आला, त्याने त्याच्याकडील कुर्‍हाडीने क्षितीजवर वार केले. त्यामध्ये क्षितीज गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर अनिकेत तेथून पळून गेला. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या क्षितीजला स्थानिक नागरीकांनी उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच अनिकेतला ताब्यात घेतले.
 

दिल्ली, गोव्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या

loading image
go to top