चेष्टा मस्करीतून मित्राचा चाकून वार करून खून

मित्रांमध्ये चेष्टा मस्करीतून निर्माण झालेल्या वादात एका तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने वार करून व लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत त्याचा खून केला.
murder
murdersakal
Updated on

पुणे - मित्रांमध्ये चेष्टा मस्करीतून निर्माण झालेल्या वादात एका तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने वार करून व लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत त्याचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी मित्र स्वत:हून फरासखाना पोलिस ठाण्यात हजर झाला. आर. सी. एम. गुजराथी शाळेसमोरील फुटपाथवर बुधवारी (ता. १) सकाळी पावणे सहा वाजता हा प्रकार घडला.

अमन अशोक यादव (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चेतन सुनील पवार (१८) असे पोलिसात ठाण्यात हजर झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघेही कचरावेचक म्हणून काम करतात.

murder
पुण्यात पावसाला सुरुवात, सकाळपासूनच पडले धुके; पाहा व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन पाटील व अमन यादव हे दोघे मित्र असून कचरावेचक आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. तसेच दीड महिन्यापूर्वी स्वारगेट परिसरात झालेल्या भांडणाचा राग देखील मनात होता. बुधवारी सकाळी ते कचरा जमा करण्यासाठी आर. सी. एम. गुजराथी शाळेसमोर आले होते. येथील फुटपाथवर त्यांच्यात जुन्या भांडणातून पुन्हा वाद झाला. त्यावेळी पवार याने यादव याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तो स्वत:च रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलिस चौकीत पोचला. पवारने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक मृतदेह पडलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The march demanded action on examination irregularities and called for accountability over issues affecting students.
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Farmers received hands-on training on traditional rice cultivation techniques with support from the Maharashtra Gene Bank and agricultural experts.
The protesters have demanded immediate administrative action to remove the encroachment and reopen the road.
Marathi News Esakal
www.esakal.com