Pune News
Pune Newsesakal

Pune News : खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याने येरवडा कारागृहातून ठोकली धूम

येरवडा पोलिस या पसार झालेल्या कैद्याचा शोध घेत आहेत.
Published on

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने येरवडा येथील खुल्या कारागृहातून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा पोलिस या पसार झालेल्या कैद्याचा शोध घेत आहेत.

Pune News
Nashik Accident News : आयशर चालकाच्या वैदयकीय चाचणी अहवालाची प्रतिक्षा

आत्माराम ऊर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय ३४) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवीपाडा येथील रहिवासी आहे. त्याने २००९ मध्ये देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी भवरला १० जुलै २०१२ रोजी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

भवरची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याची वर्तणूक चांगली असल्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. कारागृहातील पोलिस कर्मचारी तौसिफ सय्यद यांनी शनिवारी सायंकाळी कैद्यांची हजेरी घेतली. त्यावेळी भवर आढळून आला नाही. कारागृह पोलिसांनी त्याचा खुल्या कारागृहात शोध घेतला. त्यानंतर कारागृह अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भवर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com