
राठी यांचा दोन वर्षापूर्वी खून झाला होता. मात्र त्यांच्या मृतदेह मिळाल्यानंतर त्याची ओळख न पटल्याने गुन्ह्याचा तपास पुढे जात नव्हता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिस ठाण्याचे हद्दीत डॉन बॉस्को शाळेच्या मागे झुडपात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह २५ मे २०१९ रोजी मिळून आला होता.
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या तिघांनी मिळून त्यांच्या मित्राचाच खून केला. मात्र मृतदेह मिळूनही हत्यारे आणि खुनाचे कारण यांची माहिती पोलिसांनी मिळत नव्हती. पण दोन वर्षानंतर या खुनातील आरोपींना जेरबंद करण्यात येरवडा पोलिसांना यश मिळाले. पोलिसांना त्यांच्या खब-याकडून मिळालेल्या माहितीमुळे आरोपींना पकडता आहे. देवा राठी (वय २५, रा. लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे मित्र कुणाल जाधव (वय २३, राकेश ऊर्फ बापू भिसे (वय २४, लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी निखिल तुळशीराम यादव हा सध्या येरवडा कारागृहात दुसऱ्या एका गुन्ह्यात जेरबंद आहे.
राठी यांचा दोन वर्षापूर्वी खून झाला होता. मात्र त्यांच्या मृतदेह मिळाल्यानंतर त्याची ओळख न पटल्याने गुन्ह्याचा तपास पुढे जात नव्हता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिस ठाण्याचे हद्दीत डॉन बॉस्को शाळेच्या मागे झुडपात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह २५ मे २०१९ रोजी मिळून आला होता. मात्र, खून झालेल्या तरुणाची ओळख पटत नव्हती. त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार कुठे नसल्याने आरोपींचाही माग लागत नव्हता. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे व पोलिस नाईक अमजद शेख यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, राठी यांचा खून हा कुणाल जाधव व राकेश भिसे यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांनी दिली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. राठी हे हाऊस किंपींगचे काम करीत. ते मुळचे कुठे राहणारे आहेत? त्याचे कुटुंबीय कोण आहेत ? याचा तपास केला जात आहे.
- युनूस शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे