esakal | कात्रज परिसरात मित्राचा खून करुन मृतदेह घराजवळ पुरला 
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज परिसरात मित्राचा खून करुन मृतदेह घराजवळ पुरला 

किरण शिवाजी डोळे (वय 27,रा. दुगड चाळ,आयप्पा मंदिराजवळ,कात्रज)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

कात्रज परिसरात मित्राचा खून करुन मृतदेह घराजवळ पुरला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मित्राचा खून करून त्याचा मृतदेह घराजवळच्या मोकळ्या जागेत पोत्यात घालून पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी कात्रज परिसरात उघडकीस आला. दरम्यान खुनाचा हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचा संशय भारती विद्यापीठ पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

किरण शिवाजी डोळे (वय 27, रा. दुगड चाळ, आयप्पा मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

किरण डोळे हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरण हा त्याचा मित्र ओंकार जोरी याच्या घरी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मात्र तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली होती. जोरी हा त्याच्या आजीकडे रहात होता. किरण बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी आजीसह जोरी अचानक ते राहत असलेले घर सोडून निघून गेला. 

loading image
go to top