कोंढव्यात दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून तरुणाचा खून 

Murder
Murder

कोंढव्यात दहा दिवसात तिसरा खुन, तर शहरात सहा दिवसात चौथा खुनाचा प्रकार 
पुणे - शहरातील खुनांच्या घटना थांबण्याची अद्यापही चिन्हे दिसत नसल्याची सद्यस्थिती आहे. मंगळवारी सायंकाळी कोंढवा येथे मद्यपान करण्यावरुन झालेल्या भांडणातुन तरुणाच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खुन केल्याची घटना उघडकीस आला. मागील दहा दिवसात कोंढव्यात झालेला हा तिसरा खुन असून, तर मागील सहा दिवसामध्ये शहरात झालेला चौथा खुनाचा प्रकरा आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विठ्ठल रामदास धांडे (रा. कृष्णानगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश लाला म्हस्के (रा.कोंढवा) याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल व आकाश हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी सायंकाळी ते दोघेजण कोंढवा येथेच मद्यपान करीत होते. काही वेळाने मद्यपान करण्यावरुनच त्यांच्यात भांडणे झाली. यावेळी रागाच्या भरात आकाश याने विठ्ठलच्या डोक्‍यात दगड घातला.

या घटनेमध्ये विठ्ठल गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर आकाश तेथून पळून गेला. स्थानिक नागरीकांनी हा प्रकार पाहील्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विठ्ठलला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. 

दरम्यान, कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी आलेल्या संशयित आरोपी आकाश म्हस्के याच्या कुटुंबाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या प्रकरणाबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, कोंढव्यामध्ये मागील दहा दिवसांमध्ये दोन खुनाच्या घटना घडल्या, त्यापाठोपाठ मंगळवारी तिसरी खुनाची घटना घडली. तर शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक मारटकर, सराईत गुन्हेगार शैलेश घाडगे, बांधकाम व्यावसायिक राजेश कनाबार यांच्यानंतर विठ्ठल धांडे याच्या खुनाची घटना घडली. शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या खुनाच्या घडणाऱ्या घटनांमुळे नागरीकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे, तसेच जबरी चोरी, घरफोड्या, खुनाचे प्रयत्न, खुन यांसारख्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com