Pune News : मांजरी रेल्वेस्थानक परिसरात महिलेचा खून

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.
Pune News
Pune Newsesakal

पुणे : मांजरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या बेवारस महिलेचा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

Pune News
Ulhasnagar News: अजित पवारांचे एकनिष्ठ असलेले भारत गंगोत्री झाले उल्हासनगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी (ता. ६) मांजराई व्हिलेज सोसायटीजवळ एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. खुनाचे कारण समजू शकले नाही. याबाबत हडपसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com