Baner Crime : दारु पिताना झालेल्या वादातुन बांधकाम मजुराचा खुन; एकास अटक

दारु पिताना झालेल्या वादातुन एका बांधकाम मजुराचा त्याच्या ओळखीच्या व्यक्तीनेच खुन केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
murder
Murdersakal
Updated on

पुणे - दारु पिताना झालेल्या वादातुन एका बांधकाम मजुराचा त्याच्या ओळखीच्या व्यक्तीनेच खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) मध्यरात्रीच्या सुमारास बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्‍लब परिसरात घडली.

सुनील अमेल टूडू (वय ३२, रा.लेबर कॅम्प बाणेर, मुळ रा. बनकी जोर सिक्रीपाडा, जि.डुमका. झारखंड) असे खून झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. तर धोनु मोटका टुडू (वय २३, रा. लेबर कॅम्प बाणेर, मुळ रा. झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनु व सुनिल हे दोघेही झारखंडधील रहिवासी आहेत. धोनु हा पुण्यात बांधकाम प्रकल्पावर मजुरीचे काम करतो. तर, सुनील हा सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झारखंडवरुन पुण्यात कामासाठी आला होता. तो बाणेर येथील लेबर कॅम्प परिसरात राहत होता.

दरम्यान, मंगळवारी दुपारी पॅनकार्ड क्‍लब रस्त्यावरील मीरा रेसीडेन्सी परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची खबर मिळाली. त्यानंतर बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, त्यावेळी सुनीलच्या डोक्‍यात हत्याराने वार करुन त्याचा खुन करण्यात आल्याचे तसेच त्याच्या गळ्याला दोरी बांधण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससुन रूग्णालयात पाठवुन दिला.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासुन सुनीलसमवेत रात्री फिरणाऱ्या दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सुनील व धोनु या दोघांनी एकत्र दारु प्राशन केली. दारु पिताना त्यांच्यात वाद झाले, त्यातुनच धोनुने सुनीलचा खुन केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली. दरम्यान, धोनु टुडू यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com