Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

गणेश तुळवे याच्यावर विविध गुन्हे दाखल होते. तो दोन वर्षे तडीपार होता. काही महिन्यापूर्वी तो गावात आला होता.
Murder News
Murder Newsesakal
Summary

औद्योगिक वसाहतीत भर वर्दळीच्या मार्गावर खून झाल्याने कामगार वर्ग, तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

चाकण : चाकण-तळेगाव मार्गावर (Chakan-Talegaon Route) खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत एचपी चौकापासून काही अंतरावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून चाललेल्या गणेश अनिल तुळवे (वय 31, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) या तरुणावर पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात दोन वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी भावकीतील संशयित आरोपी व त्याचा एक साथीदार असे दोघे फरारी आहेत. हा खून भावकीच्या वादातून झाला असल्याची शक्यता आहे. दोघे आरोपी मात्र फरारी झाले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

Murder News
कात्रज कोंढवा मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो पलटी; 20 वारकरी जखमी

पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, "गणेश तुळवे हा त्याच्या दुचाकीवरून त्याच्या भाच्यासह खालुंब्रे येथे त्याच्या घरी चालला होता. दुचाकीवरून चाललेला असताना तो एचपी चौकापासून काही अंतरावर खालुंब्रेच्या बाजूला जात असताना चाकण-तळेगाव मार्गावर दुचाकी उभी करून थांबला. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात खोलवर वार गेल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

Murder News
Beed News : विजेच्या तीव्र धक्क्यात शेतकऱ्यासह दोन बैल ठार; शेतात कोळपणी करताना दुर्घटना

गणेश तुळवे याच्यावर विविध गुन्हे दाखल होते. तो दोन वर्षे तडीपार होता. काही महिन्यापूर्वी तो गावात आला होता. गणेश तुळवे याचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह चाकण येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिते यांनी भेट दिली.

रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके पाठविली आहेत. औद्योगिक वसाहतीत भर वर्दळीच्या मार्गावर खून झाल्याने कामगार वर्ग, तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटनेने औद्योगिक वसाहतीतील परिसरात व गावात गुंडगिरी वाढते आहे का? असाही सवाल निर्माण होतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com