Pune : बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीची हत्या, स्वतः विष प्यायला; उपचारावेळी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीची हत्या, स्वतः विष प्यायला; उपचारावेळी मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे गुरुवारी ( ता. १८ ) घडलेल्या दुर्घटनेतील समीर भिवाजी तावरे ( वय - ३५ ) याचा आज शनिवार ( ता. २० ) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध घेतल्यानंतर अत्यावस्थेत त्याला दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी गृहकलहातून समीर तावरे याची विधवा बहिण माया सोपान सातव ( वय - ३२ ) हिने विहिरीत आत्महत्या केली होती. बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर समीरनेने स्वतः ची पत्नी वैशाली तावरे ( वय- २८ ) हिच्या गळ्यावर कुर्‍हाडीने घाव घालून खून केला होता. त्यानंतर स्वतःला संपवण्यासाठी तो देखील विषारी औषध प्यायला होता.समीर याच्या मागे वडील, आई, ११ वर्षांचा मुलगा, ७ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

loading image
go to top