पुणे : तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोरेगाव पार्क परीसरामध्ये घडली.

पुणे : तरुणाच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोरेगाव पार्क परीसरामध्ये घडली.

नीलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेडगे (वय 22, रा.दरोडे वस्ती, कोरेगाव पार्क) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जनाबाई विठ्ठल शेडगे (वय 45) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनिकेत वाखारे, अभिषेक वाखारे, निळकंठ वाखारे, सागर चावरीया, फैयाज (सर्व रा. कवडे वाडी, कोरेगाव पार्क) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

गुरुवारी मध्यरात्री अनिकेत वाखारे हा त्याच्या साथीदारासह दरोडे वस्ती येथे आला. त्याने "तु जेलमधून सुटुन आल्यापासून भाई झाला आहेस का " असे म्हणत नीलेश याच्याशी वाद घातला. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर अनिकेत व त्याच्या साथीदारांनी नीलेशला मारहाण केली. त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. नीलेशच्या नावावर भोसरी पोलिस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर पडला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a young man in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: