पुणे : सणसरजवळ युवकाचा खून

KHUN.jpg
KHUN.jpg

वालचंदनगर : सणसर (ता. इंदापूर) जवळील ३९ फाटा येथे ३३ वर्षीय युवकाचा धारधार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याची घटना घडली.

येथील रमजान लालसाब शेख (वय ३३) या युवकाची गळा चिरुन खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ३९ फाटा जवळील वर्कशॉपमध्ये रमजान शेख हे रात्रीच्या वेळी झोपले असताना एक अज्ञात व्यक्तीने डाेक्याला धरुन धारधार शस्त्राने रमजानचा गळा चिरुन खून केल्याची घटना घडली.

दरम्यान, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देवून जलदगतीने तपास करण्याचे काम सुरु केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com