Murlidhar Mohol : पुण्याच्या खासदाराने कोल्हापुरात गिरविले कुस्तीचे धडे; केंद्रीय मंत्रिमंडळात मोहोळ यांच्या रूपाने राज्याचा पहिला मल्ल

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Pune MP Murlidhar Mohol) यांच्या रूपाने राज्यातील पहिल्या मल्लाने केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान पटकावले.
Pune MP Murlidhar Mohol
Pune MP Murlidhar Mohol esakal
Summary

‘मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने राज्याच्या कुस्तीला चांगले दिवस येतील. हरियाणा, पंजाबसारखे मल्ल आता राज्यात निर्माण होऊन देशाचे नाव सातासमुद्रापार करतील.'

-सचिन भोसले

कोल्हापूर : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Pune MP Murlidhar Mohol) यांच्या रूपाने राज्यातील पहिल्या मल्लाने केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान पटकावले. त्यामुळे राज्याच्या कुस्तीला (Wrestling) ऊर्जितवस्था येण्याची आशा पल्लवित झाली आहे, अशी प्रतिक्रिया कुस्ती क्षेत्रातून उमटत आहे. मोहोळ यांनी १९९० ते १९९७ दरम्यान कसबा बावडा शासकीय कुस्ती केंद्र व शाहूपुरीतील जयभवानी शाहूपुरी तालमीत (Jai Bhavani Shahupuri Talim) कुस्तीचे धडे गिरविले आहेत. त्यामुळे आजही त्यांची येथील मित्रमंडळींशी जवळीक आहे.

मोहोळ यांची भावकी व अख्खे कुटुंब कुस्तीशी निगडित आहे. विशेष म्हणजे राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करण्यामागे व महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा भरविण्यामागे नात्याने आजोबा असलेले मामासाहेब मोहोळ यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतःची पुण्यातील तालीमही त्यांनी पुणे, सोलापूर, नगर परिसरातील मल्लांकरिता बांधली. त्यामुळे मोहोळ कुटुंबातील मुरलीधर मोहोळ यांच्यातही हा वारसा उपजतच आला. मुरलीधर १९९० ते १९९५ या काळात खास कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी आले होते.

Pune MP Murlidhar Mohol
Murlidhar Mohol: "मुळशीची शान, पुण्याचा अभिमान..."; मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

त्यांनी कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्रात ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडेही गिरविले. त्यानंतर १९९७ मध्ये मोहोळ कुटुंबीयांची जवळीक असलेल्या शाहूपुरीतील जयभवानी तालमीतही मुरलीधर यांनी दोन वर्षे सराव केला. या कालावाधीत त्यांना कुस्तीतील दिग्गज वस्ताद महमद हनीफ, वस्ताद रसूल हनीफ आणि हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापुरातील राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानातील अनेक कुस्ती स्पर्धांच्या उद्‍घाटनासाठीही त्यांनी हजेरी लावली आहे.

हीच शिदोरी घेऊन त्यांनी अनेक वर्षे कुस्तीतही नाव केले आणि पुढे राजकारणातही पुण्याचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुणे मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांचा हा विजय त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचविणारा ठरला. त्यांच्या मंत्रिमंडळातील स्थानामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला गतवैभव आणि तालमींना ऊर्जितावस्था येणार असल्याची भावना अनेक ज्येष्ठ मल्लांनी व्यक्त केली आहे.

Pune MP Murlidhar Mohol
Lok Sabha Election Result : भिस्त असलेल्या मतदारसंघाने पुन्हा दिली साथ; मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात उचलला मोलाचा वाटा

‘कुस्तीमध्ये सोनीपत येथील ‘साई’ केंद्रातील उच्च दर्जाच्या सुविधा मोहोळ यांच्यामुळे महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या कुस्तीलाही मिळतील. त्यामुळे कोल्हापूरची मुले, मुली देशाच्या कुस्तीत अग्रेसर ठरतील.

-रेश्‍मा माने, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर

‘मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने राज्याच्या कुस्तीला चांगले दिवस येतील. हरियाणा, पंजाबसारखे मल्ल आता राज्यात निर्माण होऊन देशाचे नाव सातासमुद्रापार करतील.

-हिंदकेसरी दीनानाथसिंह

‘मोहोळ यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थानामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्राला एकूणच चांगले दिवस येतील. याशिवाय गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेलेले पहिले ऑलिंपिकवीर पदक विजेते खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्राप्त होण्यासाठी मोलाची मदत होईल.

-संग्रामसिंह कांबळे, राष्ट्रीय कुस्तीगीर

Pune MP Murlidhar Mohol
Murlidhar Mohol: पुण्याचा मुरलीधर दिल्लीत धुरंदर! मोहोळ यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

कसबा बावड्यात अधिक मित्रवर्ग

नव्वदीच्या शतकात कसबा बावडा पॅव्हेलियनजवळील शासकीय कुस्ती केंद्रात कुस्तीचे धडे गिरविताना त्यांचे या परिसरातील अनेक मित्र झाले. त्यांची ही मैत्री आजही टिकून आहे. विशेषतः एआयएफएफचे सदस्य, के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्याशी त्यांची खास मैत्री आहे. खासबाग कुस्ती मैदान, न्यू पॅलेस त्यांची आवडती ठिकाणे आहेत.

आठवणींना उजाळा

हिंदकेसरी मारुती माने यांनीही सांगलीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. मात्र, त्यांना तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यांच्या परीने त्यांनी त्यावेळी कुस्तीगीरांचे अनेक प्रश्‍न मांडले. मुरलीधर मोहोळ खासदार झाल्यानंतर या आठवणी पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्रात जाग्या झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com