
इंदापूर : दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे. याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक पेड मा के नाम' या उपक्रमांतर्गत 145 कोटी वृक्ष लागवड देशात करण्यात येत आहे. याच धर्तीवर इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे देवराई वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन देशाचे केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.