

Unauthorized flex banners Pune
sakal
पुणे : शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून शहर घाण करू नयेत असे आदेश भाजपतर्फे नगरसेवकांना देण्यात आले आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यावर जे नगरसेवक अनधिकृत फ्लेक्स लावत आहेत, त्यांना पद न देण्याबाबत विचार करणार का? असे विचारले असता, ‘‘पक्षाचा आदेश डावलून फ्लेक्स लावणाऱ्यांचा पक्ष गांभीर्याने विचार करेल, असा इशारा मोहोळ यांनी दिला. तसेच पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स काढून संबंधितांवर कारवाईचे आदेश आयुक्तांना दिले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले.