तारळे सायकल वितरण
मुरुडच्या केंद्र शाळेस चार सायकली भेट
कौस्तुभ मोरेंनी जपली सामाजिक बांधिलकी; मुलांची होणार सोय
तारळे, ता. २९ : समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून अनेक लोक जगतात. केवळ स्वतःपुरते न जगता इतरांचे जगणे सुसह्य व्हावे, या उदात्त हेतूने काम करणारे लोक असले, तरी त्यांची संख्या कमी आहे. अशांपैकीच एक असलेले युवा उद्योजक कौस्तुभ मोरे यांनी सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण भागातील मुरुड केंद्र शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चार सायकल वितरित करण्यात आल्या.
या वेळी प्रफुल्ल चंद्रशेखर मोरे, संतोष लक्ष्मण जाधव, दीपक क्षीरसागर, संतोष निकम, श्री. आगम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
आज ग्रामीण भागात अनेक गावांतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अडचणी येत असतात. छोट्या- छोट्या गावांत पाचवी, सातवी, दहावीपर्यंतचे वर्ग असतात. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी मोठ्या गावात अथवा नजीकच्या शहरात जावे लागते. ग्रामीण भागात मर्यादित असलेल्या प्रवासाच्या साधनांमुळे त्यांचे पुढील शिक्षण थांबते. काही जणांना आर्थिक भार सहन करावा लागतो. मात्र, मुलांची शिकण्याची जिद्द असते. यावर मात करण्यासाठी श्री. मोरे पुढे सरसावले.
केवळ प्रवासाची नसलेली साधने, आर्थिक भार पडण्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्या, तर पायी शाळेत जाणाऱ्या मुलांची गरज ओळखून व त्या मुलांना शिक्षण घेता यावे, पायी ये-जा करण्याने होणारा त्रास कमी व्हावा, या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत मुरुड येथील केंद्र शाळेत चार सायकली भेट दिल्या. त्यांच्या या कृतीचे व सामाजिक जाणिवेचे कौतुक होत आहे.
B01231
मुरुड : सायकल वितरणप्रसंगी मान्यवर.
.......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

