

निवृत्तीवेळी सीओंकडून अनाेखा सन्मान
फलटण पालिकेतील महात यांना खुर्चीत बसण्याचा मान
आसू, ता. ११ : फलटण पालिकेचे उपमुख्याधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ काम करणाऱ्या मुश्ताकअहमद अब्दुललतिफ महात यांचा पालिकेतर्फे सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी महात यांना स्वतःच्या खुर्चीवर बसवून विशेष सन्मान केला. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर यांनीही त्यांचा गौरव करत पालिकेतील अनेक जुने प्रसंग आणि त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना यावेळी उजाळा दिला.
आई-वडिलांसमोर महात यांनी सेवेत रुजू झाले अन् आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांनी निवृत्तीचा सत्कारही स्वीकारल्याचे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. यावेळी महात व त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात यांचा सत्कार केला. प्रत्येक कर्मचाऱ्याने भावना व्यक्त करत महात यांनी अनेक वर्षे प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सांभाळताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता व समन्वयक वृत्ती यांचा उल्लेख केला. त्यांच्या संयमी, कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक कार्यशैलीचे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी कौतुक केले.
महात यांच्या निवृत्तीने पालिकेतील अनुभवी, समर्पित अधिकारी कार्यमुक्त झाला असला, तरी त्यांच्या कार्याची आठवण आणि प्रशासनातील योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावनाही यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुश्ताकअहमद महात यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला.
B02563
फलटण : मुश्ताकअहमद महात यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना समशेरसिंह नाईक- निंबाळकर. त्या वेळी निखिल जाधव, मान्यवर. (अशोक सस्ते : सकाळ छायाचित्रसेवा)
..........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.