या ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी अशी सुरू आहे संगीत खुर्ची

प्रा. प्रशांत चवरे
Monday, 8 June 2020

सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद असल्यामुळे संगीत खुर्चीचा अंतिम भाग बिनविरोध व निर्धोक होतो की, विरोधक काही चमत्कार घडवितात, याबाबत ग्रामस्थांसह तालुक्यामध्ये मोठी उत्सुकता आहे.

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतीतील सत्ताधारी राष्ट्रवादी कांग्रेस सत्तेच्या संगीत खुर्चीतच मश्गूल झाल्याचे दिसून आले आहे. सरंपचपदाच्या संगीत खुर्चीचा अंतिम भाग बुधवारी (ता. १०) रंगणार आहे. मात्र, सत्ताधारी पूर्वीप्रमाणे सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध करत बाजी मारणार की, सत्ताधाऱ्यांमधील मतभेदाचा फायदा घेत विरोधक चमत्कार घडविणार, याकडे भिगवणकरांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अमोल कोल्हे म्हणतात, कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवली पाहिजे
    

भिगवण ग्रामपंचायतीच्या साडेचार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सतरापैकी चौदा जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते. पहिली अडिच वर्षे हेमाताई माडगे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. परंतु, त्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये संगीत खुर्चीचा खेळ सुरु झाला व दर सहा माहिन्यांनी नवा डाव मांडण्यात आला. मागील साडेचार वर्षात हेमाताई माडगे, अश्विनी शेंडगे, लता चोपडे, अरुणा धवडे, वंदना शेलार या पाच सदस्यांची सरपंच म्हणून काम केले आहे, तर सहाव्या सदस्याची बुधवारी (ता. १०) सरपंचपदी निवड होणार आहे. पाच सदस्यांनी उपसरपंचपद उपभोगले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील एक महिना विनाकारभारी असलेल्या भिगवणच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी (ता. १०) होणार आहे. सुरुवातीच्या काळात सत्ताधाऱ्यांमध्ये असलेली एकजूट सध्या दिसत नसल्याचे चित्र समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद असल्यामुळे संगीत खुर्चीचा अंतिम भाग बिनविरोध व निर्धोक होतो की, विरोधक काही चमत्कार घडवितात, याबाबत ग्रामस्थांसह तालुक्यामध्ये मोठी उत्सुकता आहे. सत्ताधारी सदस्यांपैकीच काही सदस्यांनी यापूर्वीच या संगीत खुर्चीस विरोध करत सत्तेच्या या डावापासून फारकत घेतली आहे. विरोधकही सत्ताधाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
    

पेट्रोल डिझेल महागले, जाणून घ्या पुण्यातील दर

याबाबत भिगवण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन बोगावत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्वांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणतेही मतभेद नसून पक्षाने दिलेला उमेदवार सरपंचपदी बहुमताने निश्चित निवडून येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Music chair is on for the post of Sarpanch of Bhigwan