Vidhan Sabha 2019 : योगेश टिळेकरांना मताधिक्य देण्याचा मुस्लिम बांधवांचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर मतदार संघातील मुस्लिम बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांना दसऱ्यानिमित्त आपट्याचे सोने देऊन मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. यावेळी हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देऊन ऐक्याची परंपरा कायम असल्याचे दाखविले.

Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर मतदार संघातील मुस्लिम बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांना दसऱ्यानिमित्त आपट्याचे सोने देऊन मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. यावेळी हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देऊन ऐक्याची परंपरा कायम असल्याचे दाखविले.

कोंढवा परिसरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांच्या पदयात्रेत सहभागी होत प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवार टिळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दसऱ्याचे सोने लुटण्याच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी टिळेकर यांची भेट घेतली. ''मुस्लिम समाज आपल्या पाठीशी असून निवडणूकीत पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या मताधिक्‍याने निवडून देणार'' असल्याची भावना यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी व्यक्त केली.

उमेदवार आमदार टिळेकर म्हणाले, "कोंढव्यामध्ये होणारा भैरवनाथाचा उत्सव सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर येथील पीरबाबाचा उत्सव होतो आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी नाथांच्या उत्सवाला सुरूवात होते. सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. गेली अनेक वर्षांची ही परंपरा आजही येथील समाजाने जपली आहे. विजयादशमीच्या निमित्ताने या बांधवांनी मला शुभेच्छा व आशीर्वाद दिला आहे. येत्या २१ तारखेलाही ते मला असाच आशीर्वाद देऊन विजयी करतील, याचा मला विश्वास आहे.'

महाराष्ट्र राज्य हज समितीचे संचालक ईम्रान मुजावर, फिरोज मुलाणी, इसाक पानसरे, मुसा ईनामदार, शाहिद ईनामदार, लाला ईनामदार, सुलतान पानसरे, निजाम शेख, मैनू शेख, अरबाज शेख, वजीर शेख, मुलाणी चाचा, अक्रम मुलाणी, पटेल चाचा, अशरफ शेख, निहाल शेख, रियाज शेख, जाहिरा शेख, सुल्ताना मकानदार, रजिया भाभी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim brothers resolve to give vote to Yogesh Tilekar for Maharashtra Vidhan Sabha 2019