धर्मापलीकडेही माणुसकीची ‘श्रद्धा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धर्मापलीकडेही माणुसकीची ‘श्रद्धा’

धर्मापलीकडेही माणुसकीची ‘श्रद्धा’

पुणे : त्यांचे वडील पोलिस दलातून निवृत्त झाले. पोलिसाची नोकरी असल्याने मुलांनाही सर्वधर्मसमभावाचे धडे मिळत गेले. एवढेच नव्हे, तर दरवेळी गणेशोत्सवात ते गणरायाच्या चरणी लीन होतात... हा नित्यक्रम गेल्या २५ ते ३० वर्षांहून अधिक काळ टिकून आहे. धर्माच्यापलीकडे जाऊन माणुसकीची ‘श्रद्धा’ जोपासणारे हे कुटुंब आहे, पोलिस शिपाई मोहसीन अब्दुल करीम शेख यांचे!

मोहसीन अब्दुल करीम शेख ऊर्फ मुन्ना हे पुणे शहर पोलिस दलामध्ये २००९ पासून कर्तव्य बजावत आहे. सध्या ते चतुःशृंगी वाहतूक विभागात पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे. वडील पोलिस असल्याने शेख १९९०पासून शिवाजीनगर पोलिस वसाहतीत राहत आहे. त्यांच्यात सर्वधर्म समभावाची शिकवण रुजली. त्यांच्या शेजारीच पोलिस कर्मचारी नरेश बलसाने यांचे कुटुंब राहात होते. बलसाने यांच्या घरी बसविण्यात येणाऱ्या गणपतीची मनोभावे पूजा करण्यास कुटुंबीय शेख प्राधान्य देतात. मोहसीन शेख हे लहानपणापासूनच बलसाने यांच्या घरच्या गणपतीच्या आरतीचा मान दरवर्षी शेख यांना मिळतो. इतकेच नव्हे, तर आता शेख यांच्या मुलीनेही गणपती घरात बसून तीही त्याची मनोभावे पूजा करीत आहे.

"आई-वडिलांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. तेच संस्कार आम्ही आमच्या मुलांवर केले. नरेश बलसाने यांच्या घरी दरवर्षी गणपतीची सेवा करण्याचे भाग्य मला मिळत आहे."

- मोहसीन शेख, पोलिस कर्मचारी

Web Title: Muslim Police Personnel Family Members Follow Ganeshas Footsteps Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top