शिवजयंती निमित्त खटाव येथील मुस्लिम समाजाचा अभिवादन उपक्रम; सामाजिक-धार्मिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश
मुस्लिम समाजाकडून शिवरायांना अभिवादन
खटाव, ता. २१ ः येथील शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना येथील मुस्लिम समाजबांधवांनी मानवता आणि बंधुभावाचा आदर्श घालून देणारा उपक्रम राबवला. शिवजयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी रसूलभाई मुल्ला, अहमद शरीफ मुल्ला, नजीरभाई मुल्ला, ताजुद्दीन शिकलगार, याकूब शिकलगार, आसिफ झारी, जहांगीर आगा, मुसा काझी आदी उपस्थित होते. समाजातील सलोखा टिकवण्यासाठी अशा सकारात्मक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात आले.
01341
खटाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करताना.(राजेंद्र शिंदे : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

