balu shete and jakir habib shaikhsakal
पुणे
Pargaon News : आषाढी वारीत वाट चुकलेल्या जेष्ठ वारकऱ्याला मुस्लीम तरुणाने केले कुटुंबाच्या स्वाधीन
जाकीर हबीब शेख या मुस्लीम तरुणाने हिंदू-मुस्लीम जातीय सलोख्याचा उत्तम आदर्श समाजापुढे केला उभा.
पारगाव - पंढरपूर येथे आषाढी वारीत वाट चुकलेल्या बाळू बाळा शेटे (रा. काठापुर बुद्रुक, ता. आंबेगाव) या जेष्ठ वारकऱ्याला अकलूज (जि. सोलापुर) च्या जाकीर हबीब शेख या मुस्लीम तरुणाने घरी नेऊन आश्रय दिला. नातेवाईकांचा शोध घेऊन सुरक्षितरित्या कुटुंबाच्या स्वाधीन करून हिंदू मुस्लीम जातीय सलोख्याचा एक उत्तम आदर्श समाजापुढे उभा केला आहे.