Mutha Canal Overflows in Manjari Water Enters Houses and Slums
sakal
मांजरी - मांजरी बुद्रुक येथील घुले वस्ती परिसरात मंगळवारी सायंकाळी मुठा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने येथील गोसावी वस्तीमधील सुमारे पन्नास झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, मांजरी-वाघोली रस्त्यावर अचानक पाणी वाहिल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.