esakal | माझा बाप्पा रुबाबदार...!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

माझा बाप्पा रुबाबदार...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड: बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. आपल्या घरात येणारा बाप्पा रुबाबदार आणि इतरांपेक्षा आगळा वेगळा असावा अशी प्रत्येक भक्ताची निस्सीम इच्छा असते. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन कोथरूडच्या बाजारपेठेत वेगवेगळ्या रूपांतील आणि आकारातील गणेशमूर्ती आल्या आहेत. सुतार दवाखाना परिसर, कोथरूड डेपो, परमहंसनगर आदी भागात गणेशमूर्तींचे स्टॉल लागले आहेत. लालबाग, दगडूशेठ, टिटवाळा अशा विविध प्रकारच्या गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. कोथरूड डेपो येथे एका विक्रेत्याने आणलेल्या भरजरी धोतर व फेटा परिधान केलेल्या गणेशमूर्ती मनोवेधक आहेत. मूर्तीला वरून पितांबर, शेला व फेटा लावून सजवल्याने त्या आकर्षक दिसत आहेत.

loading image
go to top