विशाल रेपाळ यांच्या ''गणित शाळेचा'' राज्यस्तरावर गौरव

विशाल रेपाळ यांच्या ''गणित शाळेचा'' राज्यस्तरावर गौरव

Published on

KRK26B03758
नागपूर : येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘माझी गणित शाळा’ साहित्यासह सहभागी झालेले करकंब येथील विशाल रेपाळ.

रेपाळ यांच्या ‘माझी गणित शाळा’
साहित्याचा राज्यस्तरावर गौरव

करकंब, ता. ४ : नागपूर येथील विज्ञान महाविद्यालयात पार पडलेल्या ५३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात करकंब येथील प्राथमिक शिक्षक विशाल विष्णुदास रेपाळ यांच्या ‘माझी गणित शाळा’ या साहित्यास राज्यात चतुर्थ क्रमांक मिळाला.
अलंकापुरी (करकंब) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या श्री. रेपाळ यांनी या प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या गणितासारख्या विषयाचे दैनंदिन अध्यापन प्रभावी व दर्जेदार करणे, तणावमुक्त शालेय वातावरण निर्माण करणे, मूलभूत गणितीय कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांची स्वयंअध्ययनातील रुची वाढवणे, गणिताच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे, आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे साहित्य तयार केले होते. ते सर्व वयोगटातील मुलांना आकर्षित करणारे, गणिताशिवाय इतर विषयांसाठीही खूप उपयुक्त ठरणारे असल्याने ते परिक्षकांसह राज्यभरातून आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भावले. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, जिल्हा विज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी, केंद्रप्रमुख दशरथ मोरे यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांनी त्यांचा सन्मान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com