मायलॅबचे 'कोव्हीसेल्फ' किट विक्रीसाठी उपलब्ध

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे कीट विकसित करण्यात आले आहे.
CoviSelf
CoviSelf Google
Summary

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे कीट विकसित करण्यात आले आहे.

पुणे : कोरोनावरील पहिली स्वदेशी स्वयंनिदान किट ‘कोव्हिसेल्फ’ (Coviself) आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. मायलॅब (MyLab) सोल्युशन्सने विकसित केलेल्या या कीटला नुकतीच भारतीय वैद्यक संशोधन परिषदेची (CSIR) परवानगी मिळाली आहे. देशभरातील सर्व औषधांच्या दुकानासह ऑनलाईन विक्रीसाठीही हे कीट उपलब्ध असल्याचे कंपनीने कळविले आहे. (Mylab Coviself self diagnostic kit is now available in the market)

अचूक, जलद आणि सहज करता येणारी चाचणी म्हणून कोव्हिसेल्फ ओळखली जाते. बाजारातील किटची विक्री किंमत २५० रूपये असून, आठवड्याला ७० लाख किट उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशनचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी कोव्हिसेल्फ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. देशातील प्रत्येक भागात हे कीट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विशेष करून ग्रामिण भागात हे कीट कसे पोहचेल याकडे आमचे प्राधान्य आहे.’’ आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे कीट विकसित करण्यात आले आहे.

CoviSelf
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी शास्त्रज्ञांची 'अष्टसूत्री'

असे आहे कोव्हिसेल्फ :

- नमुना घेण्यासाठी प्लास्टिक स्वाब, निदान स्ट्रीप, रसायने आदींचा समावेश

- किट संदर्भातील माहिती पत्रक

- जैविक कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी छोटीशी पिशवी

- Myab’s AI-powered mobile app डाऊनलोड करा

कोव्हिसेल्फबद्दल...

कोव्हिसेल्फची किंमत : २५० रुपये

कुठला नमुना घेणार? : नाकातील द्रव पदार्थ

किती मिनिटात निदान होणार? : १५ मिनिट

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com