Wildlife Protection: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात १३ ते १५ जुलैदरम्यान १५ चितळ हरणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने उर्वरित हरणांसाठी जैवसुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत.
कात्रज : येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात १३ ते १५ जुलैदरम्यान १५ चितळ प्रजातींच्या हरणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने तातडीने पावले उचलत उर्वरित हरणांना जैवसुरक्षा कवचाने संरक्षित केले आहे.