
पुणे : शेतजमिनींचे रूपांतर अकृषिक जमिनीमध्ये करून त्या जमिनींवर उभ्या राहिलेल्या सोसायट्यांना अकृषिक कर (एनए टॅक्स) माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला खरा, परंतु त्यास एक वर्ष होत आले तरी अद्याप त्याबाबतचा आदेश काढण्यास राज्य सरकारला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या करासह थकबाकीच्या नोटिसा सोसायट्यांना येण्यास सुरुवात झाली आहे.