साधू संताचे विचार तारतील ः जंजिरे
न्हावरे, ता. ४ ः ‘‘सध्याच्या युगात साधू संतांचे विचार आपल्याला तारतील,’’ असे मत ज्येष्ठ कीर्तनकार प्रकाश महाराज जंजिरे यांनी व्यक्त केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी पायी जाणाऱ्या पिंपळवाडी (ता. कर्जत) या दिंडी सोहळ्याच्या स्वागत प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हरी नामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या तालावर दिंडी सोहळ्याचे स्वागत न्हावरे ग्रामस्थ व श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले. श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर पिंपळवाडी (ता. कर्जत) ते श्री क्षेत्र देहूकडे गेली २९ वर्ष न्हावरे मार्गाने जाणाऱ्या या दिंडी सोहळ्याचे स्वागत न्हावरे ग्रामस्थांनी केले. यंदा देखील सरपंच संदीप यादव, बाळासाहेब देशमुख, विनायक यादव, प्रेमलता वेताळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात हरिपाठ, कीर्तन, काकडा भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या दिंडीत सहभागी वारकऱ्यांचा विशेष सत्कार सरपंच संदीप यादव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी न्हावरे परिसरातील वारकरी व मान्यवर उपस्थित होते. हा पायी दिंडी सोहळा उरळगाव, दहिवडी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, वढू, मरकळ, आळंदी मार्गे श्री क्षेत्र देहूकडे जाणार असल्याची माहिती दिंडी चालक प्रकाश महाराज जंजिरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

