नगर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नगर-पुणे महामार्गावर अज्ञात  वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on: 

नगर-पुणे महामार्गावर अज्ञात
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नगर तालुका, ता. २१ ः नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रावसाहेब खंडू उमाप (वय ५०, रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (ता. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावसाहेब उमाप हे सोमवारी रात्री कामानिमित्त दुचाकीवरून अहिल्यानगरहून सुप्याकडे जात होते. रात्री साडेअकराच्या दरम्यान त्यांची दुचाकी चास शिवारात आली असता, भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोराची धडक दिली. या अपघातात उमाप यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची तीव्रता मोठी असल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला. या घटनेमुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी मृताच्या नातेवाइकांकडून फिर्याद मिळाल्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com