Wagholi News : नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सर्वच होर्डींग अधिकृत; महापालिका अधिकाऱ्यांचा दावा

मुंबईत नुकतेच होर्डिंग पडून १६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
nagar road office advertisement hoarding are illegal municipal officer claim
nagar road office advertisement hoarding are illegal municipal officer claimSakal

वाघोली : नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ४९१ होर्डिंग आहेत. हे सर्व अधिकृत आहेत. एकही अनधिकृत होर्डिंग नसल्याचा दावा परवाना निरीक्षक गणेश भारती यांनी केला आहे. आता पर्यंत ५१९ होर्डिंग वर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. हा दावा अजब असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

मुंबईत नुकतेच होर्डिंग पडून १६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काही दिवसापूर्वी वाघोलीतही महामार्गावर होर्डिंग पडले होते. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन कार व काही दुचाकीचे नुकसान झाले.

यामुळे हे होर्डिंग धोकादायक असल्याचे समोर आले. यापूर्वीही पुण्यात होर्डिंग कोसळल्याच्या तीन दुर्घटना घडल्या. आहेत. यामध्येही दहा जणांचा बळी गेला आहे. केवळ होर्डिंग कोसळत नाही तर पावसाळ्यात त्यावरील फ्लेक्स कपडा वाऱ्याने उडून अनेक दुर्घटना घडतात.

अशी घटना घडल्यावर होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा मुद्दा उपस्थित होतो. मात्र प्रत्यक्षात ऑडीट होत नाही. केवळ कागदोपत्री घोड़े नाचवले जातात. अनेक होर्डिंग हे १५ ते २० वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो.

प्रत्यक्षात होर्डिंग किती आहेत ? किती अधिकृत ? किती अनधिकृत ? किती होर्डिंग चे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे ?. किती सुरक्षित आहेत ? याची माहिती महापालिकेकडे दिसत नाही. एकच परवाना नबर अनेक होर्डिंग वर वापरला जात असल्याचेही समजते.

तर अनधिकृत होर्डिंग गेले कुठे

सार आयटी रिसोर्सेस प्रा ली या कंपनीने 2022 मध्ये सर्व्हे केला होता. त्यात ७६९ होर्डिंग नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनधिकृत असल्याचा अहवाल दिला होता. दोन वर्षात त्यात निश्चित वाढ झाली असेल. जर नगर् रोड क्षेत्रीय कार्यालयाने 519 अनधिकृत होर्डिंग वर कारवाई केली असेल तर 200 अनधिकृत होर्डिंग गेले कुठे असा प्रश्न निर्माण होतो. ते अधिकृत करण्यात आले आहेत का ?

होर्डिंग उभारण्यासाठी अनेक नियम

होर्डिंग उभे करण्यासाठी अनेक नियम आहेत. त्याची उंची जमिनीपासून 40 फूट नसावी हा मुख्य नियम आहे. या होर्डिंग ची तपासणी केल्यास अनेक होर्डिंग नियम बाह्य असल्याचे निदर्शनास येईल

पाच पट दंड

होर्डिंग च्या परवान्यासाठी महापालिका वर्षाकाठी 280 रुपये चौरस फूट शुल्क आकारते. तर अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी पाच पट दंड आकारला जातो. जी अनधिकृत होर्डिंग अधिकृत केली आहे. ती दंड आकारून केली आहेत का असा नागरिकांचा सवाल आहे.

स्ट्रक्चरल ऑडीट असलेले होर्डिंग पडले कसे

काही दिवसापूर्वी वाघोलीतील उबाळेनगर परिसरात वाऱ्यामुळे होर्डिंग पुणे नगर महामार्गावर कोसळले. ते अधिकृत होते. त्याचे स्ट्रक्चरल ऑडीटही झाले होते मग ते कोसळले कसे असा प्रश्न नागरीकाना पडला आहे. त्यातील दोषीवर कारवाई व्हावी अशी नागरीकांची मागणी आहे.

पाच टक्के होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट

एकुण होर्डींग संखेच्या पाच टक्के होर्डिगचे स्ट्रक्चरल ऑडीट महापालीका करते. ते झाल्याची माहिती परवाना निरीक्षक भारती यांनी दिली. परंतु पाच टक्केच कसे सर्वच होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडीट होणे गरजेचे आहे. हे आतापर्यंत झालेल्या दुर्घटनेवरून अधोरेखीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com