

नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक
अधिकाऱ्यांकडे सोपवली जबाबदारी ः
सकाळ वृत्तसेवा
नगर तालुका, ता. २३ ः नगर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५७ ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या अगोदर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासन राज आहे. यामुळे आता नगर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.
गावनिहाय प्रशासक, पदांची यादी
अंबिलवाडी, हातवळण, रुईछत्तीशी व मठपिंपरी : नानासाहेब गाढवे -केंद्र प्रमुख (शिक्षण)
अकोळनेर व निंबळक : एस. ए. आंबेडकर - शाखा अभियंता (सार्वजनिक बांधकाम)
भोरवाडी, चास : निर्मला साठे -विस्तार अधिकारी (शिक्षण)
बुऱ्हाणनगर, हिवरे बाजार : चंद्रकांत निवृत्ती खाडे- विस्तार अधिकारी (पंचायत)
चिचोंडी पाटील, दरेवाडी, टाकळी काझी, दशमीगव्हाण : वाय. बी. डेरे - शाखा अभियंता
देहरे, विळद : सोमनाथ झावरे -केंद्र प्रमुख (शिक्षण)
देवगाव : आशा ठोंबरे- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
धनगरवाडी, इसळक : मनीषा कसबे - शाखा अभियंता (सार्वजनिक बांधकाम)
डोंगरगण : रामदास दळवी- विस्तार अधिकारी (पंचायत)
घोसपुरी : पी. एस. पवार- कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा)
गुंडेगाव : सचिन चौधरी- विस्तार अधिकारी (कृषी)
गुणवडी, पारगाव मौला, शिराढोण : महादू उदार - केंद्र प्रमुख (शिक्षण)
हमीदपूर, पिंप्री घुमट : रामदास बाबा गोसावी -केंद्र प्रमुख (शिक्षण)
इमामपूर, कर्जुनेखारे, बहिरवाडी : आशा पवार -विस्तार अधिकारी (कृषी)
जेऊर, ससेवाडी : सारंग दुगम - कृषी अधिकारी
कामरगाव : भगवान बोरुडे - केंद्र प्रमुख (शिक्षण)
खडकी, खंडाळा : अंबादास गारूडकर- केंद्र प्रमुख (शिक्षण)
खांडके, रतडगाव : आशा ठोंबरे- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
खोसपुरी : नितीन दळवी -केंद्र प्रमुख (शिक्षण)
कोल्हेवाडी, माथणी : दिलीप पवार -केंद्र प्रमुख (शिक्षण)
मांडवे, वाकोडी : के. बी. बनकर- शाखा अभियंता (सार्वजनिक बांधकाम)
मांजरसुंबा : एन. आर. होडगर - स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
नवनागापूर, पिंपळगाव माळवी : ललित वाकचौरे -केंद्र प्रमुख (शिक्षण)
निमगाव घाणा, पिंपळगाव वाघा : भगवान बोरुडे - केंद्र प्रमुख (शिक्षण)
निमगाव वाघा : उत्तम भोसले- केंद्र प्रमुख (शिक्षण)
पोखर्डी : सुनील नरसाळे -केंद्र प्रमुख (शिक्षण)
सांडवे : सिद्धनाथ कचरे- केंद्र प्रमुख (शिक्षण)
शहापूर : निळू ढेरंगे -विस्तार अधिकारी (कृषी)
शिंगवे नाईक : रामदास दळवी- विस्तार अधिकारी (पंचायत)
तांदळी वडगाव, वाटेफळ : मंदा माने - विस्तार अधिकारी (शिक्षण)
उदरमल : संतोष रासकर - स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
वाळुंज : प्रकाश मुरकुटे- विस्तार अधिकारी (शिक्षण)
वारूळवाडी : हेमंत भागवत - केंद्र प्रमुख (शिक्षण)
---------
प्रश्न सुटण्यास मदत
ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालावा, विकासकामे ठप्प होऊ नयेत आणि नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पंचायत, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडे ही प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्व प्रशासकांना आर्थिक बाबी प्रशासकीय कामकाज यासदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळून प्रश्न सुटण्यास मदत होईल.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.