कोतवालीतील कोठीरोड परिसरातील घटना

कोतवालीतील कोठीरोड परिसरातील घटना
Published on

महालमध्ये तस्करांचे टोळीयुद्ध
वर्चस्वाच्या वादातून कोठी रोड परिसरात गोळीबार
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १८ : वर्चस्वाच्या लढाईतून अमली पदार्थाच्या तस्करांनी कोठी रोड येथील नवयुग शाळेजवळ गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. विशेष म्हणजे, या परिसरापासून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे घर काहीच अंतरावर आहे. याप्रकरणी सौरभ घाटे (वय २७, रा. कोठीरोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
गंगा काकडे, रवी मोहतो आणि साथीदार अशी ड्रग्ज तस्करांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ हा रोहन आणि अन्य काही मित्रांसोबत कोठीरोड येथील घरासमोर होता. रात्री साडेअकराच्या सुमारास तीन मोटारसायकलवर सहा युवक तेथे आले. त्यांनी सौरभच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे सौरभसह त्याचे मित्र सैरावैरा पळू लागले. यानंतर मोटारसायकलवरून आलेले सहाही जण तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कोतवाली पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता गोळीबार करणाऱ्यातील दोघे गंगा काकडे आणि रवी मोहतो असल्याची खात्री पोलिसांना पटली.
आरोपींचा मित्र ताब्यात
गंगा आणि रवी यांनी गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांची तपास यंत्रणेला कामी लागली. गंगाचा मित्र प्रतीक कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने घटनेच्या एक-दोन दिवसांपूर्वी गंगा आणि रवी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे.
भांडणातून झाली गंगाची गॅंग
सौरभचा मोठा भाऊ प्रवीण घाटे याच्यावर एनडीपीएस आणि इतर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गॅँगमध्ये दीड वर्षांपूर्वी रवी मोहतो आणि गंगा प्रज्वल काकडे हे काम करायचे. दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, पैशाच्या वादातून त्यांचे भांडण झाले आणि दोघांनीही प्रवीणची गॅंग सोडून स्वतःची गॅंग तयार केली. तेही ड्रग्ज तस्करी करायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com